उदयपूर येथील राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी वैशाली विजय कोळी (विषय शिक्षिका) यांची निवड

<p>उदयपूर येथील राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी वैशाली विजय कोळी (विषय शिक्षिका) यांची निवड</p>

कोल्हापूर  : महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर क्र.७६ या शाळेतील शिक्षिका वैशाली विजय कोळी यांची भारत सरकारच्या कला व सांस्कृतिक विभागाच्यावतीने राजस्थान राज्यातील उदयपूर येथे दि. १७ ते २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातून १० शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यात कोल्हापुर जिल्ह्यातून एकमेव वैशाली विजय कोळी यांची निवड झालेली आहे. या निवडीसाठी महानगरपालिकेचे प्रशासनाधिकारी डी. सी. कुंभार, पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता काळे, सर्व सहकारी स्टाफ, पालक व विद्यार्थी या सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले.