डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रम सुरू

<p>डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रम सुरू</p>

कोल्हापूर - डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठामध्ये स्पोर्ट्स सायन्स अभ्यासक्रमाचा शुभारंभ झाला. 'प्रीहेंब १२१ इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स सायन्स'सोबत संयुक्त उपक्रमांतर्गत हा अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. समृद्ध क्रीडा परंपरा लाभलेल्या कोल्हापूरमध्ये या क्षेत्रातील विशेष ज्ञान आणि करिअर संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा अभ्यासक्रम सुरु केला  आहे. डी. वाय. पाटील गृपचे विश्वस्त पृथ्वीराज पाटील यांनी अभ्यासक्रम माहिती पुस्तिकेचे अनावरण करून याबाबतची घोषणा केली. 'प्रीहेंब १२१ इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स सायन्स'च्या सहकार्याने क्रीडा विज्ञानमधील पदव्युत्तर डिप्लोमा आणि चार प्रमाणपत्र अभ्यासक्रम चालू शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झालेत या अभ्यासक्रमांत स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग, इन्ज्युरी रिहॅबिलिटेशन, स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी, अॅथलीट परफॉर्मन्स ऑप्टिमायझेशन व फिटनेस मॅनेजमेंट यांचा समावेश आहे.

डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या प्राचार्य डॉ. अमृत कुवर रायजादे यांनी प्रास्तविकामध्ये हे अभ्यासक्रम सुरु करण्यामागील भूमिका विषद केली. यामुळे क्रीडा क्षेत्र आणि पूरक क्षेत्रात अनेक संधी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुलगुरू डॉ. आर. के. शर्मा यांनी, कोल्हापूरसारख्या क्रीडा संस्कृती असलेल्या शहरात जागतिक दर्जाचे क्रीडा विज्ञान शिक्षण उपलब्ध होणार असल्याचे सांगितले.