सीबीएसई पॅटर्न: नववीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘ओपन बुक परीक्षा’

मुंबई – केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ नववीच्या विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी ओपन बुक परीक्षा घेणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पाठांतर करावे लागणार नाही.
सीबीएसईच्या या पॅटर्नमुळे पुस्तकं, नोट्स आणि संदर्भ ग्रंथ समोर ठेवून नववीचे विद्यार्थी परीक्षा देवू शकणार आहेत. मुलांवर अभ्यासाचा वाढता ताण लक्षात घेवून सीबीएसईने ओपन बुक परीक्षा आणली आहे. यापुढे केवळ पाठांतरावर भर न देता, संकल्पनांच्या स्पष्टीकरणावर अधिक लक्ष केंद्रित केले जाणार आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या पद्धतीत सकारात्मक बदल घडवून आणेल अशी अपेक्षा सीबीएसईला आहे.