कोल्हापूरच्या संगीता राणे आणि अनुराधा भोसले यांना "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले" पुरस्कार प्रदान

<p>कोल्हापूरच्या संगीता राणे आणि अनुराधा भोसले यांना "ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले" पुरस्कार प्रदान</p>

कोल्हापूर - महाराष्ट्र शासनाच्या उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्यावतीने सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांचा 'ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार' वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात याचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील होते तर प्रमुख पाहुणे म्हणून अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव वेणुगोपाल रेड्डी, एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव यांची यावेळी उपस्थिती होती.

 स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि महिला सबलीकरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. महाराष्ट्राच्या सहा महसुली विभागातील अकरा महिलांना हा पुरस्कार प्राप्त झाला. यामध्ये पुणे विभागातून कोल्हापूरच्या संगीता राणे आणि अनुराधा भोसले यांचा समावेश होता. संगीता राणे यांनी दिव्यांग, मतिमंद पुनर्वसन, महिला संघटन, महिला सबलीकरण, आपत्ती निवारण, आणि आरोग्य सेवा यात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. तर अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून महिला सबलीकरण निराधारांना आधार देण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. अवनि संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांनी विविध संस्थांच्या माध्यमातून महिला सबलीकरण बाल हक्क संरक्षण आणि निराधारांना आधार देण्याचे उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला.