डॉ. डी वाय पाटील कृषी महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षेत यश
कोल्हापूर - महाराष्ट्र लोकसेवा आयोग व आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परिक्षेमध्ये डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदेच्या पाच माजी विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी सोमनाथ भरमा चौगुले याने पोलिस उपनिरीक्षक या पदाला गवसणी घातली आहे.
तसेच विविध बँकेच्या स्पर्धा परिक्षामधून अभिनव खोत (पीओ, साऊथ इंडियन बँक), मोहिनी निकम (ज्यूनियर असोसिएट, बँक ऑफ इंडिया), शिफाखान पठाण (ग्राहक सेवा सहयोगी, पंजाब सिंध बँक ) व समृद्धी पाटील (ग्राहक सेवा सहयोगी, यूनियन बँक ऑफ इंडिया ) यांची निवड झाली आहे.
माजी विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. प्राचार्य शेलार म्हणाले, महाविद्यालयातर्फे बँकिंग व इतर स्पर्धा परीक्षासाठी मार्गदर्शन आणि विविध उपक्रम सातत्याने राबविले जातात. त्यामुळे अनेक विद्यार्थी शासकीय सेवेत उच्च पदांवर कार्यरत आहेत. कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या जोरावर या सर्वांनी मिळवलेले यश इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल आहे.
महाविद्यालयातील प्राध्यापक व माजी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन आणि वेळोवेळी मिळणारी प्रेरणा तसेच आई-वडिलांचे पाठबळ यामुळे या परीक्षेत यश संपादन केल्याचे माजी विद्यार्थ्यांनी सांगितले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.