राज्यातील ‘या’ शाळांची मान्यता होणार रद्द...

विधानसभेत शिक्षण मंत्र्यांची माहिती 

<p>राज्यातील ‘या’ शाळांची मान्यता होणार रद्द...</p>

मुंबई - राज्यातील ज्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जात नाही, अशा शाळांच्या संस्थांची मान्यता रद्द केली जाणार असल्याची माहिती  शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी विधानसभेत दिली आहे. 
मुंबईतील अनेक इंटरनॅशनल शाळांमध्ये मराठी शिकवले जात नसल्याचा मुद्दा ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार हारूण खान यांनी उपस्थित केला. याला उत्तर देताना शिक्षण मंत्र्यांनी ही माहिती दिली आहे.
राज्यातील खासगी केजी, पीजी शाळांसाठी आता स्वतंत्र प्राधिकरण नेमले जाणार असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाले. खासगी पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी करणे बंधनकारक करण्यात आले असून राज्यात 12 हजार 733 केंद्रांची नोंदणी आहे. यासाठी अधिनियम केला जाणार असून त्यासाठी सक्षम प्राधिकरण निर्माण केले जाणार आहे. तीन वर्षांनी पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणी करावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.