तृतीयपंथीयांसाठी खुशखबर..! 

 राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये तृतीयपंथीयांना मिळणार मोफत शिक्षण 

<p>तृतीयपंथीयांसाठी खुशखबर..! </p>

मुंबई – राज्य सरकारने तृतीयपंथीयांना मोठी खुशखबर दिली आहे. राज्यातील सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे 100 टक्के शैक्षणिक शुल्क माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
तृतीयपंथी विद्यार्थ्यांच्या सन्मान आणि सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. तृतीयपंथी विद्यार्थ्यांचे शुल्क विद्यापीठांना स्वनिधीतून भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षणाची समान संधी मिळावी आणि तृतीयपंथी समाजही शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येऊन स्वाभिमानाने पुढे यावा, यासाठी राज्य सरकारने हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.  मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करण्याबाबतच्या सूचना विद्यापीठांनी त्यांच्या संलग्न महाविद्यालयांना परिपत्रकाद्वारे देणे गरजेचे असल्याचे सरकारने म्हटले आहे.