जागतिक महिला दिनानिमित्त डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अॅड टेकनॉलॉजीमध्ये विशेष चर्चासत्र...

<p>जागतिक महिला दिनानिमित्त डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अॅड टेकनॉलॉजीमध्ये विशेष चर्चासत्र...</p>

कोल्हापूर - डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनीरिंग अँड टेकनॉलॉजी येथे महिला विकास कक्षाच्या वतीने ‘वूमन इन लीडरशिप : ड्रायविंग इंनोव्हेशन अँड मीनिंगफुल इम्पॅक्ट’ या विषयावर विशेष चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील यशस्वी महिलांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नेतृत्व, नवोन्मेष आणि समाजातील महिलांची भूमिका या विषयावर मार्गदर्शन केले आहे. यामध्ये आर्किटेक्ट अमरजा निंबाळकर, तेज कुरिअर्सच्या व्यवस्थापकीय संचालिका साधना घाटगे, मेनन पिस्टन्सच्या कार्यकारी संचालिका शरण्या सचिन मेनन, भरत नाट्यम नृत्यांगना कविता नायर आणि क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट डॉ. उर्मिला सुरेश भोसले यांनी आपल्या अनुभवांद्वारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले.

यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपच्या सीएचआरओ श्रीलेखा साटम, पूनम गुप्ता, डॉ. क्षमा कुलाहल्ली, डॉ. रचना संपतकुमार यांची विशेष उपस्थिती होती. या चर्चासत्रात विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी नेतृत्व करताना अनुभवलेली आव्हाने संधी आणि यशस्वी वाटचाल यावर सखोल विचारमंथन केले. उद्योजकता, कला, सामाजिक क्षेत्र आणि मानसशास्त्र अशा विविध क्षेत्रातील अनुभव मांडताना वक्त्यांनी आत्मविश्वास, सातत्य आणि नवोन्मेषी विचारसरणीचे महत्त्व अधोरेखित केले.

विद्यार्थ्यांनीही उत्स्फूर्तपणे प्रश्न विचारत संवाद साधला, त्यामुळे हे चर्चासत्र प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक ठरले. आर्किटेक्ट अमरजा राजाराम निंबाळकर यांनी वारसा वास्तू संवर्धन आणि बांधकाम क्षेत्रात महिलांची वाढती भूमिका अधोरेखित करत तरुणींनी वास्तुशास्त्र आणि संवर्धन क्षेत्रात पुढे येण्याचे आवाहन केले आहे. साधना घाटगे यांनी उद्योग क्षेत्रातील अनुभव सांगताना नेतृत्व, शिस्त आणि निर्णयक्षमता यांचे महत्त्व स्पष्ट केले शरण्या सचिन मेनन यांनी आधु‌निक उद्योग व्यवस्थेत नवोन्मेषी विचार आणि तंत्रज्ञान स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली. कविता नायर यांनी, कला आणि संस्कृती क्षेत्रातून व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास वाढवण्याचे महत्त्व सांगितले तर डॉ. उर्मिला सुरेश भोसले यांनी, मानसिक आरोग्य, आत्मविश्वास आणि सकारात्मक विचारसरणीबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉ संजय डी पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, ट्रस्टी माजी आमदार ऋतुराज पाटील, ट्रस्टी पृथ्वीराज पाटील, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ. ए. के. गुप्ता, रजिस्ट्रार डॉ. एल. व्ही. मालदे, आणि प्राचार्य डॉ. एस. डी. चेडे यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले.