पुण्यातील नामांकित विद्यालयाचे ८४ जण दुबईत अडकले...
पुणे - सध्या अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सुरु असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे संपूर्ण जग हादरले आहे. दुबईमधील काही ठिकाणी हल्ले होत आहेत. त्यामुळे दुबईमधील लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. महाराष्ट्रातील पुण्यातील नामांकित विद्यालयाचे ८४ जणं दुबईमध्ये अडकले असल्याची माहिती समोर आली आहे.
८४ जणांमध्ये ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षकांचा समावेश आहे. हे सर्वजण सुरक्षित असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील नामांकित विद्यालयाचे विद्यार्थी "स्टडी व्हिजीट" साठी दुबईला गेले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाकडून पुण्यातील विद्यार्थ्यांना लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.