प्रवेश कनवाडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून डॉक्टरेट प्रदान

<p>प्रवेश कनवाडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून डॉक्टरेट प्रदान</p>

कोल्हापूर - शिरोळ तालुक्यातील धरणगुत्ती येथील  प्रा. प्रवेश श्रीकांत कनवाडे यांना शिवाजी विद्यापीठाकडून शिक्षणशास्त्र या शाखेतून डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांनी "अंगणवाडीतील बालकांच्या पालकांसाठी पालकत्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे विकसन" या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले आहे. त्यांना आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशनचे प्रा.डॉ. केशव मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. सध्या ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या कमला नेहरू ज्युनिअर कॉलेज ऑफ एज्युकेशन कराड येथे कार्यरत आहेत. त्यांनी पीएच.डी. पूर्ण केल्याबद्दल स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार  साळुंखे, मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ गावडे, सचिव शुभांगी गावडे,  कोल्हापूरचे विभाग प्रमुख श्रीराम साळुंखे, शिक्षणशास्त्र शिवाजी विद्यापीठाच्या विभागप्रमुख प्रोफेसर.डॉ. सोनकांबळे,  प्रोफेसर डॉ.खंडागळे,  प्राचार्य डॉ.नलवडे, कमला नेहरू अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या डॉ.अनिता पोतदार आदींनी  अभिनंदन केले आहे