देशातील ३० तर राज्यातील ‘हे’ दोन विद्यापीठ बोगस...: युजीसीची घोषणा
डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांना नोकरी नाकारली जाईल : युजीसी
नवी दिल्ली – विद्यापीठ अनुदान आयोगाने नुकताच देशातील बोगस आणि बनावट विद्यापीठांची यादी जाहीर केली आहे. ज्यामुळे त्या बोगस शैक्षणिक संस्थेची डिग्री घेणाऱ्या विद्यार्थ्यांची नोकरी आणि पुढील शिक्षण नाकारले जाईल, असे आयोगाने म्हटले आहे.
देशातील ३२ विद्यापीठांना आयोगाने बोगस घोषित केले आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नागपूर येथील राजा अरबी विद्यापीठ आणि सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रीय मागासवर्गीय कृषी विद्यापीठाचा समावेश आहे.
दिल्लीतील १२, उत्तर प्रदेश – ४, आंध्र प्रदेश – २, कर्नाटक – २, केरळ – २, महाराष्ट्र – २, पुदुच्चेरी – २, पश्चिम बंगाल – २, अरुणाचल प्रदेश – १, हरियाणा – १, झारखंड – १, राजस्थान – १ अशा देशातील ३२ विद्यापीठांना विद्यापीठ अनुदान आयोगाने बनावट ठरवले आहे.
बनावट विद्यापीठांमध्ये दाखला घेतल्यास विद्यार्थ्याचा वेळ, पैसा आणि करिअर तिन्ही गोष्टी खराब होऊ शकतात. देशात उच्च शिक्षणाचा वाढता विस्तार पाहता अनेक संस्था विना परवाना विद्यापीठे बनवत आहेत. त्यामुळे अशा संस्थांपासून विद्यार्थ्यांनी सतर्क रहावे. योग्य माहिती घेऊनच प्रवेश घ्यावा, असा सल्ला विद्यार्थ्यांना यूजीसीने दिला आहे.