आता ‘बालभारती’मधील  बहीण-भाऊ बोलू लागणार...

<p>आता ‘बालभारती’मधील  बहीण-भाऊ बोलू लागणार...</p>

मुंबई - सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा म्हणजे AI चा वापर सर्वच क्षेत्रात वाढत आहे. त्या अनुषंगाने आता शालेय पाठपुस्तकातील बालभारतीवरील बहीण आणि भाऊही बोलू लागणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला योग्य दिशा मिळावी, यासाठी राज्यातील शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून नवीन प्रयोग केले जाणार आहेत. बालभारतीच्या मुखपृष्ठावरील बहीण-भावाचे पात्र एआय मॉडेलच्या रूपात विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहे. हा प्रयोग अलेक्सा सारख्या व्हॉइस सहाय्यकाच्या धर्तीवर सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये  विद्यार्थी धड्यातील एखादा मुद्दा समजला नाही तर लगेच प्रश्न विचारू  शकणार आहेत. गणितातील उदाहरण, विज्ञानातील संकल्पना किंवा भाषेतील शब्दार्थ यावर ते त्वरित मार्गदर्शन देईल. शिक्षक नसताना देखील विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत ही प्रणाली करणार आहे.
राज्यातील शाळांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता वापर करून एक खास एआय सहाय्यक सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाकडून सुरु असल्याची  माहिती शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली आहे.  त्यामुळे आगामी काळात शालेय पाठपुस्तकातही कृत्रिम बुद्धिमत्तेचा सहभाग दिसणार आहे.