‘या’ जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थांसाठी बाहेर टाकला मंडप...
शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर
बीड – बीड जिल्ह्यातील दहावीच्या परीक्षा केंद्रावर अजब प्रकार घडला आहे. आज दहावीचा पहिला पेपर होत आहे. या पेपरची आसन व्यवस्था चक्क बाहेर मंडप टाकून केल्याने शिक्षण विभागाचा सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला आहे.
बीड जिल्ह्यातील कुर्ला येथे दहावीचे परीक्षा केंद्र आहे. या केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थांना पेपर सोडविण्यासाठी बाहेर मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थीची संख्या वाढल्याचे कारण देत हा मंडप उभारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. बीडमध्ये उन्हाचे तापमान जास्त असताना केंद्राने विद्यार्थ्यांच्या आसनाची व्यवस्था अशी बाहेर उन्हात केल्याने संताप व्यक्त होत आहे. तसेच बोर्ड परीक्षेत गैरप्रकार घडून नये. यासाठी अनेक उपाययोजना केले जात असताना केंद्रावरील अशा अजब प्रकारामुळे शिक्षण विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.