कलामंदिर महाविद्यालयात ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगांवकर कलादालनाचे उद्घाटन

<p>कलामंदिर महाविद्यालयात ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगांवकर कलादालनाचे उद्घाटन</p>

कोल्हापूर - कुमावत सेवा संघ संचलित कला मंदिर महाविद्यालयात ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगांवकर यांच्या नावाने कलादालन उभारण्यात आले आहे. राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते तर कला संचालक डॉ. किशोर इंगळे, वारणा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.डी.टी. शिर्के यांच्या उपस्थितीत या कलादालनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कला क्षेत्रातील योगदाना बद्दल चित्रकार जी.एस. माजगांवकर यांचा मानपत्र देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.

 यावेळी नामदार चंद्रकांत पाटील यांनी, चित्रकार जी. एस. माजगांवकर यांच्या कलाकृतींचे कौतुक करत त्यांच्या नावचे कलादानल नव्या पिढीतील चित्रकारांना प्रेरणा देत राहील, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी बोलताना ज्येष्ठ चित्रकार जी. एस. माजगांवकर यांनी, आपल्या कलामंदिर महाविद्यालया संबंधीच्या आठवणींना उजाळा देत यापुढं सुध्दा कलेच्या सेवेत राहू, अशी ग्वाही दिली.

 कला मंदिर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सहभागातून साकारलेल्या चित्र आणि शिल्पकृतींच्या वार्षिक प्रदर्शनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अठरा फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

यावेळी कुमावत सेवा संस्थेचे अध्यक्ष मारुतराव कातवरे, कुमावत सेवा संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी माजगावकर, प्राचार्य किशोर पुरेकर, अॅड. अमित बाडकर, संजय निगवेकर, सदस्य रविंद्र वागवेकर, विजय कुंभार, सर्जेराव निगवेकर, डॉ. डी.डी. कुंभार यांच्यासह विद्यार्थी आणि कलाकार उपस्थित होते.