बारावी परीक्षेला उद्यापासून सुरूवात... 

शिक्षण मंडळाकडून तयारी पूर्ण

<p>बारावी परीक्षेला उद्यापासून सुरूवात... </p>

मुंबई - शैक्षणिक जीवनातील एक महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी, बारावी बोर्डाची परीक्षा असते. या परीक्षा म्हणजे पुढील आयुष्याचा पाया मानला जातो. बारावीच्या परीक्षेला १० फेब्रुवारी म्हणजेच उद्यापासून सुरुवात होत आहे.

 महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून परीक्षेची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. १० फेब्रुवारी ते १८ मार्च या दरम्यान ही परीक्षा होणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून बारावीच्या परीक्षेसाठी एक लाख सोळा हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. एकूण २१४ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. कॉपीमुक्त परीक्षेसाठी भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्याचबरोबर जवळपास सर्व परीक्षा केंद्र परिसर आणि प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी भयमुक्त आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केले आहे.