कोल्हापूरमध्ये मुख्याध्यापक संघाच्या ५७ व्या ऑलिम्पियाड क्रीडा स्पर्धा १०-११ फेब्रुवारीला

<h3><strong>कोल्हापूरमध्ये मुख्याध्यापक संघाच्या ५७ व्या ऑलिम्पियाड क्रीडा स्पर्धा १०-११ फेब्रुवारीला</strong></h3>

 

कोल्हापूर – जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ५७ व्या ऑलिम्पियाड क्रीडा स्पर्धा १० व ११ फेब्रुवारी रोजी विभागीय क्रीडा संकुल, संभाजीनगर येथे आयोजित केल्या जात आहेत.

स्पर्धांमध्ये कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल आणि मैदानी खेळ यांचा समावेश असून, जिल्ह्यातील सुमारे ६०० खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. मंगळवारी कबड्डी, खो-खो आणि हॉलीबॉल स्पर्धा तर, बुधवारी सर्व मैदानी खेळाचे आयोजन केले जाणार आहे.

मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, क्रीडा समितीचे चेअरमन डी.एस. एरुडकर आणि संदीप पाथरे यांनी सर्व सहभागी शाळांना सकाळी ९ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.