डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या प्र. कुलपतीपदी ऋतुराज पाटील यांची नियुक्ती... 

कुलपती डॉ. संजय पाटील यांची घोषणा

<p>डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या प्र. कुलपतीपदी ऋतुराज पाटील यांची नियुक्ती... </p>

कोल्हापूर -  हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या प्र. कुलपतीपदी विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांची नियुक्ती करत असल्याची घोषणा कुलपती डॉ. संजय पाटील यांनी केली.तळसंदे येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठाच्या तिसऱ्या दीक्षांत समारंभात डॉ. पाटील यांनी ही घोषणा केली. 


डॉ. संजय पाटील म्हणाले,  विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी २०१७ पासून डी. वाय. पाटील समुहामध्ये जबाबदारी स्वीकारून डेव्हलपमेंट केली. त्यावेळी ४ हजार विद्यार्थी संख्या आता १६  हजारावर पोहचली आहे.  तळसंदे येथे कृषी  विद्यापीठ सुरू करण्यासाठीही त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. तीन वर्षात त्यांनी विद्यापीठाचे नाव देशभरात पोहचवले. यामुळे आता त्यांच्यावर विद्यापीठाच्या प्र. कुलगूरु पदाची जबाबदारी देत आहे.  यावेळी वैजयंती पाटील,  संजय किर्लोसकर, वृषाली पृथ्वीराज पाटील, पुजा पाटील,देवश्री पाटील, तेजस पाटील, डॉ. अनिलकुमार गुप्ता, डॉ. जे. ए. खोत, विलास शिंदे, भावित नाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले. 
यावेळी विश्वस्त ऋतुराज पाटील यांनी, २०१७ पासून संस्थेची जबाबदारी सांभाळत आहे‌. या पदामुळे माझी जबाबदारी आणखी वाढली असून निश्चितच या पदाला साजेसे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.