राष्ट्रीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत कोल्हापूरच्या अनन्या व्हटकरची चमकदार कामगिरी
कोल्हापूर - करवीर तालुक्यातील शिंगणापूर येथे दरवर्षी पौष अमावस्येला विशालतीर्थ यात्रा भरते. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या तीर्थ स्थानी, यात्रे दिवशी हजारो भाविक स्नान आणि देवदर्शनासाठी येत असतात. आज सकाळी कोल्हापुरातील मंगळवार पेठेत राहणारा ओम राजेंद्र पाटील हा तरुण शिंगणापूरला देवदर्शनासाठी आला होता. शिंगणापुरातल्या पंचगंगा नदीत स्नान करत असताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो नदीत बुडाला. स्थानिक नागरिकांनी आरडाओरडा करत तात्काळ त्या तरुणाला बेशुद्ध अवस्थेत नदी पात्रातून बाहेर काढले आणि उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र उपचारापूर्वी त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची नोंद सीपीआर पोलीस चौकीत करण्यात आली आहे.