कामाच्या ठिकाणी मोबाईल चोरीचा आळ आला म्हणून..

सांगरूळच्या तरुणाने स्वत:ला संपवले.

<p> कामाच्या ठिकाणी मोबाईल चोरीचा आळ आला म्हणून..</p>

 

 कोल्हापूर -  सांगरुळ ( ता.करवीर) येथील रोहित उर्फ कुमार आनंदा कांबळे हा कोल्हापूरातील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होता.नोकरीच्या ठिकाणी त्याच्यावर मोबाईल चोरीचा आळ आला होता.यामुळे आलेल्या नैराश्यातून रोहितनं २१ नोव्हेंबरला विषारी औषध प्राशन केले होते.त्याला उपचारांसाठी सीपीआर मध्ये दाखल करण्यात आले होते.आज सकाळी उपचारां दरम्यान रोहितचा मृत्यू झाला आहे.
             रोहितच्या नातेवाईकांशी आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी   मोबाईल चोरीचा आळ आल्याच्या नैराश्यातूनच रोहितने स्वत:चे जीवन संपवले असून याप्रकरणी संबंधित कंपनीतील ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.त्यांनी ठेकेदारा वर कारवाई होत नाही तोपर्यंत रोहितचा मृतदेह ताब्यात घ्यायला नकार दिल्याने सीपीआर परिसरात तणाव निर्माण झाला आहे.