स्मशान भूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करणारा मांत्रिकाची गावातून काढली धिंड...
कोल्हापूर - पुलाची शिरोली येथे स्मशान भूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करणारा मांत्रिक किशोर लोहार आणि त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करणारा त्याचा सहकारी अभिजित मोहिते या दोघांना शिरोली एमआयडीसी पोलिसांनी दोन दिवसापूर्वी अटक केली होती. पोलिसांनी त्या दोघांची पुलाची शिरोली गावातून धिंड काढत त्यांना पोलिसी खाक्या दाखवला. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती.