जयसिंगपूरमधील तरूणाच्या खून प्रकरणी चौघा संशयितांना अटक... अन्य दोघांचा शोध सुरू

<p>जयसिंगपूरमधील तरूणाच्या खून प्रकरणी चौघा संशयितांना अटक... अन्य दोघांचा शोध सुरू</p>

कोल्हापूर - जयसिंगपूरमधील सुनील किसन पाथरवट या तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून निघृण खुना केला होता मंगळवारी रात्री लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मध्यरात्री ही घटना घडली ऐन दिवाळी सणात झालेल्या या घटनेमुळे शहरात खळबखळ उडाली होती दरम्यान या घटनेनंतर जयसिंगपूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तपणे तपास सुरू केला.

या प्रकरणी मुख्य संशयित आरोपी शेखर पाथरवट, सागर कलगुटगी यांना तमदलगे इथून तर विजय पाथरवट आणि संजय पाथरवट यांना चौडेश्वरी फाटाक इथून शिताफीने अटक केली आहे. या चौघांनी खुनाची कबुली दिली आहे.मात्र खुनाचे कारण अस्पष्ट आहे. या चौघांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

 दरम्यान या खून  प्रकरणी पसार असलेल्या अन्य दोघांचा पोलिस शोध घेत आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, जयसिंगपूर पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार निलेश मांजरे, ताहीर मुल्ला, महेश खोत, संजय कुंभार, रहिमान शेख आदिंनी या कारवाईत सहभाग घेतला.