धक्कादायक : फलटणच्या शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरची आत्महत्या

<p>धक्कादायक : फलटणच्या शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरची आत्महत्या</p>

सातारा – सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात महिला डॉक्टरने आत्महत्या केली आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.  
आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने  हातावर सुसाईड नोट लिहिली आहे त्या सुसाईड नोटमध्ये दोन पोलीस अधिकाऱ्यांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. 
मजकुरात त्यांनी नमूद केले आहे की, “पोलीस निरीक्षक गोपाल बदने याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला, तर पोलीस प्रशांत बनकर याने मला सतत मानसिक त्रास दिला आहे”