बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला एलसीबीकडून अटक

कोल्हापूर – शहरातील भोई गल्लीमधून जावेद बागवान हा आपल्या चारचाकी वाहनातून गुटख्याची अवैधरित्या वाहतूक करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी भोई गल्ली परिसरात सापळा रचून अवैधरित्या गुटखा वाहतूक करताना जावेद बागवान याला अटक केली आहे. त्याच्याकडून सुमारे पावणे तीन लाख रुपयांचा गुटखा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चार चाकी वाहन असा १० लाख ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.