गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांना एलसीबीने केली अटक

कोल्हापूर - स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला आज राधानगरी - कोल्हापूर मार्गावरून एका चारचाकी वाहनातून गोवा बनावटीच्या मद्याची अवैधरित्या वाहतूक करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने या मार्गावरील वाशी नाका परिसरात सापळा रचून कारवाई करण्यात आली.
या कारवाईत गोवा बनावटीच्या मद्याची वाहतूक करणाऱ्या सांगली जिल्ह्यातील पलूस मधून शुभम साळुंखे आणि आशुतोष साळुंखे या दोघांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी त्यांच्याकडून ५१ हजार रुपयांचा गोवा बनावटीचा मद्यसाठा आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले चारचाकी वाहन असा सुमारे सात लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.