कोल्हापूर - सांगली रोडवर हिट अँड रनची घटना... सर्व घटना सीसीटीव्ही कैमेरात कैद 

सर्व घटना सीसीटीव्ही कैमेरात कैद 

कोल्हापूर - कोल्हापूर - सांगली रोडवरील कोंडीग्रे फाटा येथे काल रात्री भीषण अपघात झाला आहे. भरधाव स्विफ्ट कारने समोरून येणाऱ्या  टू व्हीलरवरील दोघांना धडक दिली आहे. या धडकेत टू व्हीलरवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कैमेरात कैद झाली आहे. 
सीसीटीव्ही कैमेरात सर्व वस्तुस्थिती निदर्शनास आली असताना जयसिंगपूर पोलिसांनी या भीषण अपघातात टू व्हीलर वाल्याने धडक दिल्याचे नोंद केले आहे. हा सर्व प्रकार हिट अँड रनचा असताना पोलीस कोणाला वाचवत आहेत, असे सवाल उपस्थित होत आहे.