बसमध्ये चढताना सोन्याचे दागिने असलेली महिलेची पर्स लंपास

कोल्हापूर - पन्हाळा तालुक्यातील आसुर्ले येथे राहणाऱ्या कविता माने या शनिवारी सायंकाळी परगावी जाण्यासाठी दसरा चौकातल्या बस थांब्यावर उभ्या होत्या.
त्या कोल्हापूर - निपाणी बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्याजवळची एक लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने असलेली पर्स लंपास केली आहे. या प्रकरणी कविता माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.