कोल्हापुरात सात लाख रूपये किंमतीच्या चांदीच्या मूर्त्या असलेली पिशवी लंपास...

कोल्हापूर – शहरातील बद्रिनगर परिसरात सर्जेराव विठ्ठल लव्हटे हे कुटुंबिया समवेत राहतात. लव्हटे हे गुजरी मधील भगवती ज्वेलर्सला देवाच्या चांदीच्या मुर्त्या बनवून देण्याचे काम करतात. बुधवारी २४ सप्टेंबर रोजी लव्हटे हे सुमारे ७ लाख रुपये किंमतीच्या चांदीच्या गणेश मूर्ती आणि लक्ष्मी देवीच्या मुर्त्या पिशवीतून घेवून आपल्या मोपेड वरून गुजरीकडे येत होते. ते क्रशर चौक परिसरातून पुढे येत असताना चक्कर आल्याने पडले. यावेळी अज्ञाताने त्यांची चांदीच्या मूर्ती असलेली पिशवी लंपास केली आहे. या प्रकरणी लव्हटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जुना राजवाडा पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.