भानामती करण्याच्या नावाखाली सावर्डेत आर्थिक फसवणूकीचा प्रकार

 

मानसिक त्रास दूर करण्यासाठी गेले आणि मनस्ताप वाढवून बसले...

<p>भानामती करण्याच्या नावाखाली सावर्डेत आर्थिक फसवणूकीचा प्रकार</p>

इचलकरंजी - हातकणंगले तालुक्यातील सावर्डे येथे आशिष बाळासाहेब कांबळे हे मानसिक त्रास होत असल्याने कबनूर मधील रियाज सय्यद याला भेटले. सय्यदने त्यांना तुमच्यावर कुणीतरी करणी केली असून ती काढण्यासाठी विविध पूजा कराव्या लागतील असं सांगत कांबळेंकडून सदुसष्ठ हजार रुपये उकळले.

काही दिवसांनी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आशिष कांबळेंनी सय्यदकडं पैसे परत मागायला सुरुवात केली. सय्यदनं कांबळेंना पंचवीस हजार रुपये दिले मात्र उरलेले पैसे द्यायला त्यानं नकार दिला. त्यामुळं आशिष कांबळे यांनी शिवाजीनगर पोलीसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीवरुन पोलीसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अघोरी प्रथा प्रतिबंधक कायद्या अंतर्गत रियाज सय्यद विरोधात गुन्हा दाखल केला आहे.