घरफोडी करणाऱ्या तिघांना राजारामपूरी परिसरातून अटक...

<p>घरफोडी करणाऱ्या तिघांना राजारामपूरी परिसरातून अटक...</p>

कोल्हापूर - स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक केलीय. आदित्य दिंडे, वैभव कांबळे ,सुमित जाधव अशी त्यांची नावं असून पोलिसांनी त्यांच्याकडून तांब्या पितळेची भांडी, देवाच्या मुर्त्या, एलईडी, मोबाईल, मोपेड असा 3 लाख 13 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.

कोल्हापुरातील राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सरनाईक कॉलनीत राहणाऱ्या शारदा चव्हाण या 6 सप्टेंबर ते 9 सप्टेंबर दरम्यान परगावी गेल्या होत्या.  यावेळी अज्ञातांनी त्यांच्या  बंद घराचा कडीकोंयडा तोडून घरात प्रवेश करत घरातील एलईडी, मोबाईल, तांब्या पितळेची भांडी लंपास केली होती. या प्रकरणी शारदा चव्हाण यांच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.  दरम्यान या घरफोडीचा समांतर तपास करताना आदित्य दिंडे आणि त्याच्या साथीदारांनी मिळून ही चोरी केल्याची माहिती पोलिसांंना मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज राजारामपुरीतील नवश्या मारुती मंदिर परिसरातून घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक केलीय.