एलसीबी ची कारवाई: घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त


 

<p>एलसीबी ची कारवाई: घरफोडी करणाऱ्या तिघांना अटक, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त</p>

कोल्हापूर - कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केलीय. आदित्य दिंडे, वैभव कांबळे आणि सुमित जाधव अशी अटक करण्यात आली आरोपींची नावे असून त्यांच्याकडून 3 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केलाय. सरनाईक कॉलनीत राहणाऱ्या शारदा चव्हाण या परगावी गेल्या असताना 6 ते 9 सप्टेंबर दरम्यान अज्ञातांनी त्यांचं घर घर फोडलं होतं. अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि एलईडी टीव्ही, मोबाईल फोन, तांब्या-पितळेची भांडी व देवमूर्त्या चोरून नेल्या. याबाबत राजारामपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास करत आदित्य दिंडे व त्याच्या साथीदारांचा छडा लावला. राजारामपुरीतील नवश्या मारुती मंदिर परिसरातून तिघांना अटक करण्यात आलं. तांब्या-पितळेची भांडी, देवमूर्त्या, मोबाईल संच, एलईडी टीव्ही, गुन्ह्यात वापरलेली मोपेड असा एकूण जप्तीची 3 लाख 17 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे राजारामपुरी परिसरातील घरफोडीचा उलगडा झाला असून महत्त्वाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय

ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे आणि अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, समीर कांबळे, राजू कांबळे, शिवानंद मठपती, प्रवीण पाटील, विशाल खराडे, परशुराम गुजरे, गजानन गुरव, अरविंद पाटील, राजेंद्र वरंडेकर यांचा समावेश होता.