कळंबा जेल परिसरात गॅस स्फोट...एकाचा मृत्यू 

<p>कळंबा जेल परिसरात गॅस स्फोट...एकाचा मृत्यू </p>

कोल्हापूर – कोल्हापूर शहरातील कळंबा जेल परिसरात गॅस स्फोट झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये काल (सोमवार) रात्री 11 च्या सुमारास घरगुती गॅस स्फोट् झाला आहे. यामध्ये दोन लहान मुलांसह एक जण जखमी झाले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर शहरामध्ये थेट गॅस पाईपलाईनने गॅस पुरवठा सुरू झाला आहे. त्यानुसार नुकताच कळंबा जेल परिसरातील एलआयसी कॉलनीमध्ये थेट गॅस पाईपलाईनने गॅस पुरवठा सुरू करण्यात आला आहे. शितल भोजने यांच्या घरामध्ये रात्रीच्या वेळेस गॅसचा अचानक स्फोट  झाल्याने मोठा गोंधळ उडाला. यावेळी तिघे जण जखमी झाले असून उपचार दरम्यान शितल अमर भोजने यांचा मृत्यू झाला आहे.
या स्फोटामध्ये घरातील साहित्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब तात्काळ दाखल झाले. अग्निशमन दलाचे स्थानक प्रमुख जयवंत खोत यांच्यासह जवान येथे आले. त्यांनी स्थिती नियंत्रण आणली. दरम्यान जखमींना सीपीआर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.