गाढ झोपेत असताना घराची भिंत कोसळली...पाच जण जखमी

<p>गाढ झोपेत असताना घराची भिंत कोसळली...पाच जण जखमी</p>

इचलकरंजी – शहरातील  जमीर गोलंदाज हे सेंट्रीग कामगार असून ते सहारा निवारा कॉलनीत भाड्याच्या घरात राहण्यास आहेत. त्यांच्या घरालगतच नानासो वायदंडे यांच्या मालकीचे आरसीसी बांधकाम सुरू आहे. जमीर गोलंदाज, त्यांच्या पत्नी जबीन गोलंदाज, मुलगा अमन, मुली आलिया आणि आलिशा तसंच शाहबुद्दीन गोलंदाज हे गाढ झोपेत असताना शनिवारी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास गोलंदाज राहण्यास असलेल्या घराची भिंत अचानकपणे कोसळली. त्यामध्ये मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडल्याने पाचही जण जखमी झाले आहेत तर घरातील टिव्ही, फ्रीज, कपाट आणि प्रापंचित साहित्याचे जवळपास ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या घटनेस कारणीभूत नानासो वायदंडे यांच्यावर जमीर गोलंदाज यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.