हिंदुस्तानी भाऊचे सोशल अकांउट बंद करण्याची मागणी

कोल्हापूर - शहरातील नांदणी मठातील माधुरी हत्तीण "वनतारा" या प्राणी संग्रहालयाला पाठवल्यानंतर कोल्हापुरात मोठी संतापाची लाट उसळी होती. या दरम्यान माधुरी हत्तीणीला पुन्हा नांदणी मठात आणण्यात यावे. यासाठी कोल्हापुरात भव्य मोर्चा देखील काढण्यात आला होता. त्यादरम्यान मुंबईतील स्वतःला हिंदुस्थानी भाऊ समजणारा विकास पाठक याने सोशल मीडियावर कोल्हापूरवासीयांच्या विरोधात गरळ ओकली होती. या प्रकरणी मूळचे कोल्हापूरचे रहिवासी असणारे आणि सध्या मुंबईस्थित रहिवासी असलेले संतोष घोलप यांनी मुंबई पोलिसांत तक्रार दिली होती.
घोलप यांच्या तक्रारीची दखल घेऊन आज त्यांचा कोल्हापूर सायबर पोलिसांनी जबाब नोंदवून घेतलाय. तसेच विकास पाठक याच्यावर कारवाई करण्याची ग्वाही दिलीय. विकास पाठक याचे सोशल मिडियावरील अकाऊंट कायमस्वरूपी बंद करा, अशी मागणी संतोष घोलप यांनी केली आहे.