बेकायदेशीररित्या रिव्हॉल्वर बाळगल्याच्या प्रकरणात तिघांना अटक; १.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
बेकायदेशीररित्या रिव्हॉल्वर बाळगल्याच्या प्रकरणात

कोल्हापूर – स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीर रित्या रिव्हॉल्वर जवळ बाळगणाऱ्या तिघांना अटक केली आहे. अटकेतील व्यक्तींची नावे सद्दाम गुडवाडे, प्रथमेश पाटील आणि संजय पाटील अशी असून, त्यांच्या जवळून सुमारे १,२०,५५० रुपयांचा मुद्देमाल, त्यात रिव्हॉल्वर व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे.
पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेला विक्रम नगर परिसरात दोन जण बेकायदेशीर शस्त्रासह फिरत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत पोलिसांनी तीघांना अटक केलीय.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालंदर जाधव, तसेच अंमलदार वैभव पाटील, योगेश गोसावी, गजानन गुरव, विशाल खराडे, संतोष बर्गे, शिवानंद मठपती, राजू कांबळे, अरविंद पाटील, प्रदीप पाटील, परशुराम गुजरे, सतीश सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.