कष्टानं वाढवलेल्या मुलीनं जीवन संपविलं, होत्याचं नव्हतं झालं...कारण गुलदस्त्यात

<p>कष्टानं वाढवलेल्या मुलीनं जीवन संपविलं, होत्याचं नव्हतं झालं...कारण गुलदस्त्यात</p>

हातकणंगले : कोरोची इथल्या चिंतामणी मंदिर नजीक राहणाऱ्या मीनाक्षी जनार्दन कोडुलकर या १५ वर्षीय शाळकरी मुलीनं राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कष्टानं वाढवलेल्या मुलीनं जीवन संपविल्यानं, होत्याचं नव्हतं झालं. या घटनेनं कोडुलकर कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. याची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झालीय.

याबाबतची माहिती अशी, मयत मीनाक्षीचे वडील जनार्दन कोडुलकर हे स्क्रॅप खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. शुक्रवारी सकाळी पत्नी पूजा सह ते कामानिमित्त घराबाहेर गेले होते. मीनाक्षी देखील सकाळी शाळेला गेली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास आई पूजा या कामावरून जेवणासाठी घरी परतल्या असता त्यांना घराचा दरवाजा उघडा असलेला दिसला. घरात जाऊन पाहिलं असता वरच्या मजल्यावरील खोलीत मीनाक्षीनं छताच्या लोखंडी पाईपला साडी बांधून गळफास घेतल्याचं त्यांना निदर्शनास आलं. त्यांनी तत्काळ पती जनार्दन यांना फोन करून याबाबतची माहिती दिली. त्यांनी शहापूर पोलिसांना कळविलं. कष्टानं वाढवलेल्या मुलीनं असं जीवन संपविल्यानं, कोडुलकर कुटुंबीयांचं होत्याचं नव्हतं झालं. त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. दरम्यान, मीनाक्षीनं आत्महत्या का केली, याचं नेमकं कारण समजू शकलं नाही. अधिक तपास शहापूर पोलीस करतायत.