दुचाकी चोरट्यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी केली अटक

<p>दुचाकी चोरट्यास लक्ष्मीपुरी पोलिसांनी केली अटक</p>

कोल्हापूर – शहरातील कोष्टी गल्लीत राहणारे चंद्रकांत घोरपडे यांनी महाराणा प्रताप चौक परिसरात लावलेली दुचाकी १८ जुलैला दुचाकी चोरीला गेली होती. या बाबत त्यांनी लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार दिली होती. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक श्रीराम कन्हेरकर यांनी गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांना तपासाच्या सूचना केल्या होत्या.

हवालदार गजानन परीट आणि प्रीतम मिठारी हे दोघेजण दिवसा गस्त घालत होते. दरम्यान लक्षतीर्थ वसाहत येथील  एका मंदिराजवळ एक व्यक्ती दुचाकीसह आढळून आला. त्याच्याकडील दुचाकी चोरीची असल्याची पोलिसांचा संशय होता. त्यानंतर प्रशांत या सुतार या दुचाकीस्वाराला संशयावरून ताब्यात घेतले. चौकशीअंती त्याने ही दुचाकी महाराणा प्रताप चौकातून चोरल्याची कबुली दिली आहे. या सोबतच कळे आणि गगनबावडा पोलिसांच्या हद्दीतून देखील २ दुचाकी चोरल्याचे त्याने कबुल केले आहे. त्याने लपवून ठेवलेल्या दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्यात. राधानगरी तालुक्यातील कोलोली पैकी पानारवाडी येथे राहणाऱ्या प्रशांत हा सेंट्रींग आणि सुतार काम करत होता. त्याच्याकडून एक लाख २० हजार रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्यात. न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ही कारवाई हवालदार मंगेश माने, अतुल पाटील, गजानन गुरव, सतीश तानुगडे, सुनील भदरगे यांनी केली आहे.