तावडे हॉटेल बसथांब्यावर महिलेकडील दीड लाखांची पर्स चोरी

<p>तावडे हॉटेल बसथांब्यावर महिलेकडील दीड लाखांची पर्स चोरी</p>

कोल्हापूर – उंचगाव मणेर मळा परिसरातील विठ्ठलाई कॉलनीत राहणाऱ्या मुमताज शेख यांची दीड लाख रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची पर्स अज्ञात व्यक्तींनी लंपास केली. हा प्रकार तावडे हॉटेलजवळील बस थांब्यावर शुक्रवारी दुपारी घडला.

मुमताज शेख या आपल्या कुटुंबासमवेत उंचगाव मणेर मळा परिसरात राहतात. त्या शुक्रवारी कामानिमित्त कोल्हापुरात आल्या होत्या. घरी परतताना तावडे हॉटेल बस थांब्यावर उभ्या असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची पर्स चोरून नेली. सदर पर्समध्ये सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने होते.

या प्रकरणी मुमताज शेख यांनी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शाहूपुरी पोलिस करत आहेत.