कोल्हापुरात तीस लाखांची फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक

स्वस्त दागिने, जादा परताव्याचा मोह पडला महागात

<p>कोल्हापुरात तीस लाखांची फसवणूक करणाऱ्या महिलेला अटक</p>

कोल्हापूर - शहराजवळील शिवाजी पेठेत अनिता सूर्यवंशी या कुटुंबीयांसोबत राहतात. त्यांचा स्टेशनरी साहित्य विक्रीच्या व्यवसाय आहे. नोव्हेंबर २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत सुभाषनगरातील जयश्री माजगावकर हिच्याशी त्यांची ओळख झाली. ओळखीनंतर जयश्री हिने माझा सोने खरेदीचा व्यवसाय आहे. मला सोने खरेदीसाठी पैशांची गरज आहे. तुम्ही मला मदत करा, मी तुम्हाला त्याच्या चांगला मोबदला देतो असे सांगून सूर्यवंशी यांच्याकडून २० लाख ४५ हजारांची रोकड आणि ९ लाख रुपये किंमतीचे ३० तोळे वजनाचे सोन्याचे दागिने घेतले. काही दिवसानंतर सूर्यवंशी यांनी जयश्रीकडे पैसे आणि दागिने परत मागितले. मात्र तिने पैसे आणि दागिने देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जयश्री हिच्या विरोधात जुना राजवाडा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. बुधवारी रात्री उशिरा पोलिसांनी जयश्री हिला अटक केली होती. आज तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तिला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावलीय. या प्रकरणी पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश पाटील पुढील तपास करत आहेत.