धक्कादायक : कर्नाटकातील ‘या’ धर्मस्थळाच्या नदी किनारी सापडले शेकडो मृतदेह...

<p>धक्कादायक : कर्नाटकातील ‘या’ धर्मस्थळाच्या नदी किनारी सापडले शेकडो मृतदेह...</p>

बेंगलुरू – कर्नाटकातील मंजुनाथेश्वर धर्मस्थळ जवळ धक्कादायक घटना घडली आहे. या धर्मस्थळाच्या  नेत्रावती नदीच्या काठावर शेकडो मृतदेह पुरल्याचा दावा एका सफाई कर्मचाऱ्याने केला होता. या दाव्यानंतर विशेष तपास समितीने (SIT) १३ ठिकाणी खोदकाम सुरु केले. खोदकामाच्या तिसऱ्या दिवशी १५ मानवी हाडे सापडली आहेत. सध्या एका मुलीची हाडे सापडल्याचा दावा एसआयटीने केला आहे. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.


या ठिकाणी जी हाडे मिळत आहेत. त्यातली काही हाडे महिलांची आहेत. त्यांच्यावर बलात्कार करुन त्यांची हत्या करण्यात आली आहे आणि त्या महिलांचे मृतदेह पुरण्यात आले आहेत. बलात्कार आणि हत्येची ही प्रकरणं २० वर्षांपूर्वीची असल्याची माहिती एसआयटीने दिली आहे.