नांदणीतील 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल...

काहींना घेतलं ताब्यात 

<p>नांदणीतील 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल...</p>

कोल्हापूर – काल सुप्रीम कोर्टाने 'महादेवी हत्तीण' हिला अंबानींच्या राधेकृष्ण मंदिर हत्ती कल्याण केंद्रास सोपवण्याचा निर्णय दिल्यानंतर नांदणीकरांना मोठा धक्का बसला. कोर्टाच्या निर्णयानंतर हत्ती कल्याण केंद्राचे लोक महादेवी हत्तीणीला घेण्यासाठी नांदणीत दाखल झाले होते.

यावेळी नांदणीत हत्तीणीला निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय उसळला होता. यावेळी लोकांच्या डोळ्यातील अश्रू थांबत नव्हते. याच वेळी संतापलेल्या लोकांनी पोलिसांवर दगडफेक आणि गाड्यांची तोडफोड केली. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने जनसमुदाय वेळीच आटोक्यात आला. परंतु दगडफेक केल्या प्रकरणी आज शिरोळ पोलिसांनी नांदणीतील 70 ते 80 जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील 39 जणांची नावे निष्पन्न झाली असून काहींना ताब्यात घेण्यात आले आहे.