एमडी ड्रग्सची विक्री करणारा शहापूर पोलिसांच्या ताब्यात,पावणे सात लाखाचं ड्रग्ज जप्त

इचलकरंजीतील शहापुर पोलीस ठाण्याच्या पथकानं मिशन झिरो क्रूज मोहिमेअंतर्गत अवैध अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरोधात कारवाई केलीय. पोलीस अमलदार सतीश कुंभार यांना संशयित आरोपी ऋषभ खरात हा अवैध मेफेडून क्रूज घेऊन विक्रीसाठी शहापुर परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून हातकणंगले तालुक्यातील कोरोची गावच्या ऋषभ राजू खरात याला अटक करत त्याच्याकडून ६ लाख ७३ हजारांचं एम. डी क्रूज जप्त केलंय. खरात याच्यावर अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल केला असून शहापुर पोलिसांकडून पुढील तपास सुरूय.
पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, उपनिरीक्षक महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, पोलीस अंमलदार अविनाश मुंगसे, प्रमोद भांगरे, महेश कोरे, अर्जुन फातले, रोहित ढवळे इम्रान मुल्ला यांच्या पथकानं ही कारवाई केलीय.