अभिनेत्री संगिता बिजलानीच्या बंगल्यात चोरी

<p>अभिनेत्री संगिता बिजलानीच्या बंगल्यात चोरी</p>

पवनानगर - बॉलीवूड अभिनेत्री संगिता बिजलानीच्या पवनाधरण परिसरातील बंगल्यात चोरी झालीय. चोरट्यांनी ७ हजार रुपये किंमतीचा टीव्ही आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेलाय. ७ मार्च २०२५ ते १८ जुलै २०२५ या कालावधीत चोरी झालीय. १८ जुलै रोजी सकाळी संगिता बिजलानी आपल्या बंगल्यावर आल्या असता चोरीची ही घटना उघडकीस आली. चोरट्यांनी बंगल्याच्या पाठीमागील बाजूने कंपाऊंड फोडून पहिल्या मजल्यावर प्रवेश केला आणि चोरी केली. याप्रकरणी बिजलानीकडील खाजगी कामगार मोहम्मद मुजीब खान यांच्या फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरुय.