आर के नगरात घरफोडी...पाऊण लाखांचा ऐवज लंपास

आर के नगरात घरफोडी...पाऊण लाखांचा ऐवज लंपास

कोल्हापूर - कोल्हापूरजवळील आर. के. नगर परिसरातल्या साई शक्ती कॉलनीत अश्विनी आदिनाथ गवळी या आपल्या कुटुंबीयां समवेत राहतात. दोन दिवसांपूर्वी गवळी कुटुंबीय कामानिमित्त परगावी गेले होते. या संधीचा फायदा घेत चोरट्यांनी गवळी यांच्या घरात चोरी केलीय.


 गवळी यांच्या दुसऱ्या मजल्यावरील तिजोरीत ठेवलेले सोन्याचे मनी मंगळसूत्र, कर्णफुले, चांदीची जोडवी, पैंजण आणि रोकड असा सुमारे पाऊण लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. रविवारी सकाळी गवळी कुटुंबीय परगावाहून परतल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार निदर्शनास आला आहे. या प्रकरणी आश्विनी गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करवीर पोलिसात अज्ञाताविरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे. गेल्या महिनाभरात याच परिसरात चोरट्यांनी अनेक बंद घरांना लक्ष्य करत लाखों रूपयांचा ऐवज लंपास केला आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले  आहे. पोलिसांनी परिसरात रात्री गस्त ठेवून चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली आहे.