कोल्हापुरात उपचारासाठी आलेल्या कर्नाटकातील महिलेचे साडे सहा लाखाचे दागिने लंपास
कोल्हापूर – कोल्हापुरात उपचारासाठी आलेल्या कर्नाटकातील महिलेचे साडे सहा लाखाचे दागिने अज्ञाताने लंपास केल्याची घटना घडली आहे.
कर्नाटकातील प्रमिला माने या त्यांची बहीण सविता माने हिला दाखवण्यासाठी शनिवारी सकाळी शाहूपुरी पाच बंगला रेल्वे फाटक परिसरातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. यावेळी सविता हिच्या कडील सुमारे साडे सहा लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले आहे. या प्रकरणी प्रमिला माने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञाता विरोधात शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.