चालकाला वळणाचा अंदाज न आल्यानं मोटार आदळली दगडावर...

'ते' धोकादायक वळण ठरतंय जीवघेणं

<p>चालकाला वळणाचा अंदाज न आल्यानं मोटार आदळली दगडावर...</p>

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील कंदलगावमध्ये भारती विद्यापीठ परिसरात मुलांसह वाहनचालकांची नेहमी वर्दळ असते. या परिसरात मोठ्या प्रमाणात व्यवसाय वाढत असल्यानं या ठिकाणाहून वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरु असते. कंदलगावमधील सृष्टी पार्क रस्त्यानजीक वारंवार अपघात घडतायत. या रस्त्यावरील धोकादायक वळणाचा मोटार चालकाला अंदाज न आल्यानं मोटार थेट गॅस गोडाऊन जवळच्या परिसरातील दगडावर जाऊन आदळली. या अपघातात सुर्देवानं कुणालाही दुखापत झाली नसली तरी मोटारीचा अक्षरश: चक्काचूर झालाय. या ठिकाणच्या धोकादायक वळणार सूचना फलक नसल्यानं वारंवार अपघात घडतायत. रात्रीच्या वेळी तर वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतोय. रस्त्यावर गतीरोधक करून धोकादायक वळणावर सूचना फलक लावण्याची मागणी नागरिकांनी केलीय.