जमिनीच्या वादातून हिंगणगावात दुहेरी खून; भावानेच वडील व सख्ख्या भावाचा घेतला जीव

<p>जमिनीच्या वादातून हिंगणगावात दुहेरी खून; भावानेच वडील व सख्ख्या भावाचा घेतला जीव</p>

हातकणंगले : तालुक्यातील हिंगणगाव येथे जमिनीच्या वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली असून एका भावानेच आपल्या सख्ख्या भावाचा आणि वडिलांचा निर्घृण खून केल्याची घटना रविवारी दुपारी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबात जमिनीच्या वाटपावरून मागील काही दिवसांपासून वाद सुरू होता. हा वाद दिवसेंदिवस तीव्र होत गेला आणि अखेर त्याचे रूपांतर हिंसाचारात झाले. रविवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास आरोपीने फावडे आणि कुऱ्हाडीचा वापर करून वडील व भावावर हल्ला केला. या हल्ल्यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी स्वतःहून सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास पोलिस ठाण्यात हजर झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून कुटुंबातील वादाचे भीषण रूप पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.