सांगरूळात सराफाला तिघा अज्ञातांनी दाखवला पिस्तुलाचा धाक... सहा तोळे दागिने लुटले

<p>सांगरूळात सराफाला तिघा अज्ञातांनी दाखवला पिस्तुलाचा धाक... सहा तोळे दागिने लुटले</p>

कोल्हापूर - करवीर तालुक्यातील सांगरूळ येथे लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक तेजस सुंदेशा गेली १५ ते १६ वर्ष सराफ व्यवसाय करत आहेत. दररोज सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत त्यांचे दुकान सुरू असते. दररोज ९ वाजेपर्यंत घरी येणारे तेजस हे घरी आले नाहीत. ते फोनही उचलत नसल्याने त्यांचे पुतणे लक्ष्मण माळी, अमित माळी यांनी त्यांचा शोध सुरू केला. सांगरुळमधून कोल्हापूरला जाताना मोठा भरावा आहे. या ठिकाणी ते माहिती घेत गेलेत, यावेळी शेतात त्यांच्या ओरडण्याचा आवाज आला. माहिती घेतली असता शेतात तेजस माळी हे हातपाय आणि तोंड बांधलेल्या स्थितीत शेतात निदर्शनास आले. यानंतर त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री उपचारानंतर उशिरा पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आले. शनिवारी रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ते दुकान बंद करून सांगरुळहून कोल्हापुरातील गंगावेश परिसरातील आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. सांगरूळ येथील विलास कॉर्नर परिसरात पोहोचल्यानंतर पाठलाग करत आलेल्या तिघांनी त्यांच्या गाडीच्या पुढे आपली गाडी आडवी लावून अडवले. त्यांनी तेजस यांना शेतात ओढत नेऊन हातपाय बांधून घातले. तोंडात बोळा घालून तोंडाला चिकटपट्टी लावून आणि पिस्तुलाचा धाक दाखवून त्यांच्याकडील ६ तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून घेतले. त्यानंतर ते तिघे अज्ञात कोल्हापूरच्या दिशेने गेल्याचे तेजस सुंदेशा यांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच करवीर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी ठसे तज्ञांसह श्वानालाही पाचारण करण्यात आले. पोलिसांकडून या भागातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे सांगरुळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.