अमृतनगर ते चिकुर्डे रस्त्यावर भीषण अपघात…प्राध्यापकाचा मृत्यू

 

<p>अमृतनगर ते चिकुर्डे रस्त्यावर भीषण अपघात…प्राध्यापकाचा मृत्यू</p>

<p> </p>

कोल्हापूर - हातकणंगले तालुक्यातील निलेवाडीचे प्राध्यापक बाबासाहेब मनोहर शेळके ईश्वरपूरमधील सुधाताई पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होते. ते बुधवारी दुपारी दुचाकीवरुन ईश्वरपूरहून कोडोलीच्या दिशेने येत होते. ते बिरदेव वसाहतीजवळ आले असताना भरधाव चारचाकीने समोरुन शेळकेंच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचा चक्काचूर होऊन चारचाकी पाचशे मीटर अंतरावर शेतात जाऊन थांबली. अपघातानंतर चारचाकी चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता स्थानिकांनी पकडून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. जखमी बाबासाहेब शेळके यांना कोल्हापूरातील खाजगी रुग्णालयात उपचारासांठी दाखल करण्यात आले होते. मात्र बुधवारी रात्री उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. प्राध्यापक शेळके यांच्या मृत्यूमुळे वारणा परिसरातून हळहळ व्यक्त होतीय. पेठवडगांव पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पोलिसांनी चारचाकी चालकाला ताब्यात घेतले आहे.