लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातबाबत अनेक धक्कादायक खुलासे...

<p>लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातबाबत अनेक धक्कादायक खुलासे...</p>

नाशिक - लैंगिक अत्याचार करणाऱ्या अशोक खरातला पोलिसांनी अटक केली आहे. परंतु त्याच्याबाबत अनेक धक्कादायक खुलासे समोर येवू लागले आहेत.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) नेमले आहे. वरिष्ठ अधिकारी तेजस्वीनी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली हे पथक काम करणार आहे.  गुन्हे शाखेने खरातच्या सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील फार्महाऊसवर छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांच्या हाती काही महत्त्वाची कागदपत्रे लागली असून त्याची मालमत्ता आणि व्यवहारांशी संबंधित माहिती तपासात समोर आली आहे. याच ठिकाणाहून एक पिस्तूल आणि काही जिवंत काडतुसेही जप्त करण्यात आली आहेत.