नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरातला अटक... पोलिसांनी केलं तब्बल 58 व्हिडिओ जप्त
नाशिक – नाशिकमधील बहुचर्चित भोंदूबाबा अशोक खरात उर्फ कॅप्टन याला अटक करण्यात आली आहे. या भोंदूबाबाला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
या मांत्रिकाने गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी तब्बल 58 व्हिडिओ जप्त केल्याची माहिती समोर आली आहे. या व्हिडिओंमध्ये काही नामांकित महिला आणि सेलिब्रिटी संबंधित असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.